महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनीयम 1961 मधील कलम 81 व 83 च्या अधिन राहून समाज कल्याण समिती पुढील व्यक्तींची मिळून बनलेली असेल.
1) जिल्हा परिषदेने आपल्या परिषद सदस्यांमधून निवडून दिलेले 09 परिषद सदस्य, तथापि उपलब्धतेच्या अधिन राहून त्यापैकी क. 5 जागा अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या परिषद सदस्यांसाठी राखीव असतील. आणि यापैकी किमान दोन अनुसूचित जमातीसाठी राखीव असतील. ख. 4 जागा नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या परिषद सदस्यांसाठी राखीव असतील.
2) जिल्हा परिषदेने आपल्या महिला परिषद सदस्यांमधून निवडून दिलेल्या दोन महिला परिषद सदस्या.
3) जिल्हा परिषदेचा समाजकल्याण अधिकारी हा समितीचा पदसिध्द सचिव असेल.
मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे