सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सांमान्य) यांचे अधिनस्त होत असून ते जिल्हा परिषदेचे सचिव म्हणुन काम पाहतात. जिल्हा परिषद, वर्धा मध्ये वर्ग-3, वर्ग-4 कर्मचा-यांच्या नेमणुका, पदोन्नती, जिल्हा बदली, नियकालिक बदल्या बाबत हा विभाग नियंत्रण ठेवतो. त्याचप्रमाणे वाहन, निवृत्ती वेतन, खातेनिहाय चौकशी, अतिउत्कृष्ट कामासाठी वेतनवाढी, गोपनीय अहवाल, राष्ट्रिय कार्यक्रम व दिन इ. कामे या विभागमार्फत पार पाडली जातात. तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) व सर्व गट विकास अधिकारी यांचे पगार भत्ते व सेवां सबंधींची कामे पाहण्यात येतात. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने रचना व कार्यपद्धतीची सर्व विभागंची व पं.स. च्या निरिक्षणाची कामे पार पाडली जातात. या विभागाच्या नोंदणी शाखेमार्फत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नावे येणारे सर्व शासन संदर्भ, शासकिय निमशासकीय कार्यालयाकडील संदर्भ, मा.लोकआयुक्त, प्रतिनीधी, मंत्री, खासदार आमदार व सर्वसामान्य नागरीक यांचेकडून प्राप्त होणारे सर्व पत्रव्यवहार या शाखेकडे स्विकारल्या जातात. त्यानंतर जिल्हा परिषद, अंतर्गत संबंधीत विभागाकडे वितरीत केल्या जातात. या शिवाय विभाग प्रमुख व पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी व ग्रामिण स्तरावरील इतर अधिकारी यांची समन्वय सभाचे आयोजन या विभागामा्र्फत केले जाते.
मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे