महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 81 च्या तरतुदींना अधीन राहून जलसंधारण व स्वच्छता समितीमध्ये पुढील सदस्यांचा समावेश असेल. क. अध्यक्ष पदसिध्द सभापती ख. पुढील समित्यांचे सभापती- (एक) कृषि समिती पदसिध्द सदस्य (दोन) वित्त समिती पदसिध्द सदस्य (तीन) काम समिती पदसिध्द सदस्य ग. जिल्हा परिषदेने परिषद सदस्यामधून निवड करावयाचे 5 परिषद सदस्य ड. मुख्य कार्यकारी अधिकारी, पदसिध्द सदस्य यांना मतदानाचा अधिकार असणार नाही. च. कार्यकारी अभियंता (ग्रामिण पाणी पुरवठा) जिल्हा परिषद, पदसिध्द सचिव यांना मतदानाचा अधिकार असणार नाही. छ. कार्यकारी अभियंता (सिंचाई) जिल्हा परिषद, पदसिध्द सचिव यांना मतदानाचा अधिकार असणार नाही. जलसंधारण व स्वच्छता समितीला जलसंधारण व स्वच्छता या विषयाच्या संबधात जे अधिकार असतील व ज्यांचा वापर ती करीत असेल तेच अधिकार योग्य त्या फेरफारासह त्या फेर फारासह असतील व ती त्यांचा वापर करील.
मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे