मागासवर्गीयांचे सामजिक व शैक्षणिक जीवनमान उंचावणे व त्यांच्या उन्नतीसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वेगवेगळया योजना व उपक्रम राबविण्यात येतात. तसेच शासनाच्या धोरणात्मक आदेशानुसार जिल्हा परिषदांनी त्यांच्या उत्पन्नाच्या किमान २० % निधी मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करणेसाठी सदर योजनांची अंमलबजावाणी व नियंत्रणाचे कार्य जिल्हा परिषदेच्या माध्यमातून समाजकल्याण विभागामार्फत करण्यात येते.
१) समाज कल्याण विभागामार्फत मागासवगीय विद्यार्थांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदान करणे, वर्ग ५ ते ७ मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती देणे, इयत्ता ८ वी ते १० मध्ये शिकणाऱ्या अनु. जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती देणे, वर्ग ८ ते १० मध्ये शिकणाऱ्या विजा/भ.ज. प्रवर्गातील मुलींना शिष्यवृत्ती देणे, जिल्ह्यातील अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती देणे, अनुदानित वसतीगृहांना अनुदान, आंतरजातिय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान.
२) अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास, वृध्दाश्रमाकरीता अनुदान, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विद्यावेतन, अपंग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजना तसेच जिल्हानिधीमधून मागासवर्गीय लाभार्थ्याना योजनांचा लाभ देणे, इत्यादी योजना राबविण्यात येतात.
३) 13 वने लेखाशिर्ष अंतर्गत प्राप्त तरतुदीतुन विवीध योजना राबविणे.
४) मागासवर्गीय वस्तीगृहांना सहाय्यक अनुदाने, शिक्षणफी व परिक्षाफीप्रदाने, औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतन.
५) जिल्हा निधीतुन राखीव 5 टक्के निधीतुन दिव्यांगकल्याण योजना.
६) जिल्हानिधी मधुन महिला करीता २० टक्के तरतुदीतुन राबविण्यात येणाऱ्यायोजना जसे शिलाई मशीन वाटप, लेडीजसायकल, संगणकप्रशिक्षण, फॅशनडिझाईनइत्यादी .
७) वृध्दकलाकार मानधन.
मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे