या समितीत आठ जि. प. सभासद असतात उपाध्यक्ष हे या समितीचे सभापती असतात. जिल्हा शिक्षणाधिकारी हे या समितीचे सचिव असतात. जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा प्रसार करणे, शाळेच्या इमारती बांधणे, क्रीडांगणांचा विकास, शिष्यवृत्ती, वसतीगृहे, शालोपयोगी साहित्याचे वाटप, अनुदान देणे आदी कामे ही समिती करते. निरक्षरता दूर करण्यात ही समिती मोठ्या प्रमाणावर कार्य करते. यादृष्टीने प्रौढ शिक्षणाचे कार्यक्रम ही समिती राबविते.
मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे