भारत देशामधे बहूतांश लोकसंख्या ग्रामीण भागामधे राहते. ग्रामीण भागातील जनतेस शुध्द व स्वच्छ आरोग्यदायी पाणी पुरवठा करणे हा या विभागाचा मुख्य उद्देश आहे, शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीस 40 लीटर पाणी दरदिवशी दरमाणसी देण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा योजनांची आखणी व अंमलबजावणी केली जाते. तसेच शासनाने सन 2001 या वर्षापासून मागणी आधारीत लोकसहभागाचे धोरण स्विकारले आहे. यामागे शासनाच्या ग्रामीण जनतेने पिण्याच्या पाण्याच्या व त्या अनुषंगाने आरोग्याच्या बाबीकडे गांभिर्याने लक्ष देण्याची व लोकांच्या सहकार्याने पाणी पुरवठा योजनांची कामे करून घेण्याचा मानस आहे. मागील 10 वर्षापासून आपल्या राज्यांमधे देशाच्या विविध भागांमधे पाण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. भुजल पातळी ही अत्यंत खाली गेलेली असल्याने उदभवाचे बळकटीकरण तसेच जलसंधारणची कामे घेऊन भुजल पातळीमधे वाढ होण्याच्या दृष्टीने घेण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांची कामे पारदर्शक पध्दतीने होण्याच्या दृष्टीने व कामांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने ग्रामसभेने ग्रामस्तरावर ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती स्थापन करून त्या समित्या मार्फत कामे केली जातात. उद्देश :- या योजनेचा मुलभूत उद्देश हा ज्या खेडयांना पाणी पुरवठा योजना उपलब्ध नाही अशा खेडयांसाठी (वाडयांसाठी, वस्त्यांसाठी) पिण्यासाठी शुध्द व स्वच्छ पाणी पुरवठा करून देणे.
मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे