या समितीत नऊ सभासद असतात. जिल्हा वैद्यकीय अधिकारी हे या समितीचे सचिव असतात. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी ही समिती घेत असते. प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना, दवाखाने काढणे, रोगप्रतिबंधक लसींचा पुरवठा, गलिच्छ वस्ती निर्मूलन, साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, शिशुसंगोपन आदी कामे ही समिती करते. बांधकाम समिती : या समितीतही नऊ सभासद असतात. जिल्ह्यातील रस्ते, पूल, प्रशासकीय इमारती बांधणे आदी कामे ही समिती करते. महिला आणि बालकल्याण समिती : १९९२ पासून या समितीची राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधून स्थापना करण्यात आली. या समितीत जि. प. च्या निवडून आलेल्या सर्व महिला सदस्यांचा समावेश असतो. समितीच्या सभापतीपदी महिलेची निवड केली जाते. या समितीमार्फत महिला कल्याण आणि बालसंगोपनाच्या विविध योजना राबविल्या जातात.
मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे