महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनीयम 1961 मधील कलम 81 व 83 च्या अधिन राहून महिला व बाल कल्याण समिती पुढील व्यक्तींची मिळून बनलेली असेल.
1. जिल्हा परिषदेने आपल्या परिषद सदस्यांमधून निवडून दिलेले 08 परिषद सदस्य. परंतू महिला व बालकल्याण समितीवरील सदस्यापैकी किमान 70 टक्के महिला परिषद सदस्य असतील.
2. जिल्हा परिषदेने या बाबतीत विनिर्दिष्ट केलेला जिल्हा परिषदेचा विभाग प्रमुख हा जिल्हा परिषद त्याबाबतीत निर्देश देईल त्याप्रमाणे अशा विषय समितीचा पदसिध्द सचिव असेल.
(अ) कोणताही परिषद सदस्य एकापेक्षा अधिक समित्यांवर (स्थायी समिती धरुन) निवडून दिला जाणार नाही. (परंतू जिल्हयातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती धरुन कोणत्याही जिल्हा परिषदेच्या सदस्यांची एकूण परिषद सदस्यांस आवश्यक असले तेवढया मर्यादेपर्यत केवळ दोन समित्यांवर निवडून देता येईल.)
(ब) समितीचे प्रत्येक निवडणूक (स्थायी समिती धरुन) ही एकल संक्रमणीय मताव्दारे प्रमाणशिर प्रतिनिधीत्वाच्या पध्दतीनुसार घेण्यात येईल.
मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे