विभागाचे विभाग प्रमुख कृषी विकास अधिकारी (वर्ग-1) आहेत. त्यांच्या मदतीस जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य वर्ग-2), मोहिम अधिकारी (वर्ग-2), जिल्हा कृषी अधिकारी विघयो वर्ग-2), असे तीन राजपत्रित अधिकारी शासनाने नेमलेले आहेत. कृषी विभागाचे काम सुरळीत होण्यासाठी तालुका स्तरावर पंचायत समिती अंतर्गत कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषी) हे कर्मचारी गट विकास अधिकारी यांचे अधिनस्त काम पाहतात. त्यांच्यामार्फत कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतात. शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत सुधारणा होणे व शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हा कृषी विभागाचा उद्देश आहे.
कृषी विभागाकडील कामकाजाबाब सर्वसाधारण माहिती
विभागाची उद्दिष्टे :- जिल्ह्यात उपलब्ध होणारी रासायनिक खते बी बियाणे,किटकनाशके इ. निविष्ठा शेतकऱ्यांपर्यत पोहोचवणे तसेच जिल्ह्यात निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देणे ही विभागाची जबाबदारी आहे.
१) जिल्ह्यात प्राप्त झालेल्या कृषी निविष्ठा योग्य गुणवत्तेच्या आहेत किंवा नाही याची तपासणी करणे.
२) जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्री करण्यासाठी कृषी केंद्राचे परवाने देणे.
३) विशेष घटक योजना अनु. जाती / अनु.जमाती उपयोजना :- दारिद्रय रेषेखालील अनु. जाती / अनु.जमातीच्या शेतकऱ्यांची मार्गदर्शक सुचनेनसार निवड करुन त्यांना विहिर /जुनी विहिर दुरुस्ती , कृषी औजारे, बैलगाडी, बैलजोडी इ. बाबींवर अनुदान देवून शेती उत्पादनात वाढ करणे पर्यायाने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे.
४) कृषी यांत्रिकिकरण योजना :- शेतकऱ्यांना विविध साहित्य जसे पिक संरक्षण उपकरणे मनुष्य चलित, पिक संरक्षण उपकरणे स्वयं चलित, सुधारीत कृषी औजारे मनुष्य चलित, सुधारीत कृषी औजारे स्वंय चलित HDPE/PVC पाईप ,विद्युत मोटारी 3HP/5HP साहित्य अनुदानावर उपलब्ध करुन देणे.
५) जिल्हा परिषद सेस फंड योजना :- जिल्हा परिषद सेस फंड योजने अंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यातील अल्प व मध्यम व इतर सर्व शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर लाभ जसे विद्युत मोटारी 3HP/5HP इ. लाभ देण्यात येतो.
मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे