वर्धा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत इ.१ ली ते ७ वी च्या मुलांना व मुलींना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येते. जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे विभाग प्रमुख असून तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी हे तालुक्याचे विभाग प्रमुख असतात.इ.१ ली ते इ.७ वी च्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत केंद्रशासन पुरस्कृत व राज्यशासन पुरस्कृत अशा विविध योजना वर्धा जिल्हा परिषद वर्धा मार्फत राबविल्या जातात.
१) जिल्हातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षण.
२) जिल्हातील ग्रामीण प्राथमिक शिक्षकांच्या आस्थापना विषयक सर्व बाबी.
३) दुर्बल घटकातील मुलींच्या पालकांना उपस्थिती भत्ता .
४) प्राथमिक शाळांच्या बांधकामासाठी जि.प.ला प्राप्त अनुदानातुन शाळा बांधकामे
५) प्राथमिक शाळांच्या बांधकामासाठी जि.प.ला प्राप्त अनुदानातुन शाळा दुरुती.
मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे