पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या दि.1 नोव्हेंबर 2012 रोजीच्या शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-2012/प्र.क्र.72/पापु-07 नुसार उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्या नियंत्रणाखालील संपुर्ण स्वच्छता अभियान-TSC (निर्मल भारत अभियान-NBA) व कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा यांच्या सनियंत्रणाखालील जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष (DWSM cell) यांचे विलीनीकरण करण्यात आले. यानुसार एकीकृत कक्षास जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष (District Water & Sanitation Mission Cell- DWSM Cell) असे नाव देण्यात आले. यानंतर पुढे या कक्षाची जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली व या कक्षाचे सनियंत्रण नव्याने पद निर्मिती करून उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यांचेकडे देण्यात आले. या कक्षात एकुण 7 शाखा कार्यरत आहेत यामध्ये 1.स्वच्छता शाखा 2. पाणी गुणवत्ता शाखा 3.माहिती शिक्षण व संवाद शाखा 4.मनुष्यबळ विकास शाखा 5.सनियंत्रण व मुल्यमापन शाखा 6.वित्त शाखा 7.आस्थापना शाखा. या सर्व शाखांमार्फत स्वच्छता, पाणी गुणवता, पाणी बचत याबाबत प्रचार, प्रसार व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे