पशुसंवर्धन समितीवर जि. प. चे आठ निर्वाचित सदस्य असतात. पशुसंवर्धनअधिकारी हे या समितीचे सचिव असतात. ही समिती उच्च प्रतिच्या जनावरांची पैदास करणे, पशुवैद्यकीय दवाखाने स्थापन करणे, वैरण विकास, घोडे-गाढव आदी जनावरांची उपयुक्तता वाढविणे, शेळी, मेंढी,कुकुट आणि वराह पालनास प्रोत्साहन देणे, गुरांचे प्रदर्शन भरविणे, दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न करणे तसेच स्वयंरोजगार योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना दुधाळ गायी-म्हशींचा पुरवठा करणे आदी कामे.
मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे