• सेवाग्राम आश्रम

सन 1940 साली गांधीजींनी सेगाव या गावाचे नामकरण सेवाग्राम केले. महात्मास गांधीच्या पदस्पर्श आणि वास्तव्याने पुनीत झालेले क्षेत्र म्हणजे सेवाग्राम. वयाच्या 67 व्या वर्षी म्ह्णजेच 30 एप्रिल 1936 च्या पहाटे महात्मा गांधी वर्ध्या पासून आठ किलोमीटर अंतरावरील सध्याच्या सेवाग्राम या ठिकाणी पोचले. पाच ते सहा दिवस ते याठिकाणी राहिले. येथील ग्रामस्थांना त्यांनी त्यांच्या येण्यामागील उद्देश सांगितला. तसेच भूमिका विषद केली. त्या्नंतर हळूहळू सेवाग्राम आश्रम भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचे केंद्र बनले. सेवाग्रामचे पूर्वीचे नाव सेगाव होते. हे गाव पूर्ण जंगलाने वेढलेले होते. ना पोस्ट ऑफिस ना टेलिग्राफ ऑफिस. केवळ सेवाग्राम गावाकडे येण्यासाठी एक पादचारी आणि बैलगाडीचा रस्ता होता.

आश्रमातील कुटी

सेवाग्राम येथे गांधीजी येण्यापूर्वीच मीरा बेन येथे वास्तंव्यास होत्याह. सेवाग्रामकडे येण्यासाठी त्याकाळात पक्का रस्ताही नव्हाता. परंतु जेव्हा गांधीजी सेवाग्राम येथे आले तेव्हा तत्काळ येथे एक बगल रस्ता तयार करण्यावत आला. गांधीजींनी त्यांच्या वास्तयव्यासाठी उभारण्यातत येणा-या कुटीकरीता 500 रुपयांहून अधिक खर्च लागणार नाही ही अट घालून कुटी उभारण्याएसाठी परवानगी दिली. या कुटीलाच आदि निवास म्हणून ओळखले जाते. या कुटीमध्ये महात्मा गांधीजी, कस्तुरबा गांधी, सरहद्द गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राहायचे. याच कुटीतून पुढे महात्मा गांधी बापू कुटीत राहायला गेले.

‘बापू’ कुटी आणि ‘बा’ कुटी

आदि निवासात गावक-यांची संख्या. दिवसेंदिवस अधिक वाढल्याने गांधीजींच्या अनुयायी मीरा बेन यांनी त्यांच्या कुटीच्या पूर्वेला अजून एक नवीन कुटीची निर्मिती केली. ही कुटीही गांधीजींच्या कार्यालयाकरीता देऊन त्यांनी गावाजवळच स्थलांतर केले. या कुटीलाच आज बापू कुटी आणि बापू ऑफिस असे संबोधले जाते.